वीरः वीर राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथील अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या गायरानातील घराच्या प्रश्नाबाबत झेंडे यांनी विधमंडळात ठराव करून हा प्रश्न सोडवावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना झेंडे यांनी दिली. येथील गायरानातील परिसरात लोकांनी घरे बांधली आहेत. ही अतिक्रमणे हटवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ही अतिक्रमण काढल्यामुळे येथील नागरिक बेघर होतील, असा प्रश्न अॅडव्होकेट बिपिन शिंदे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना झेंडे बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी मिळालेले संभाजीराव झेंडे हे निवृत्ती शासकीय अधिकारी आहेत. तसेच स्वच्छ प्रतिमा आणि कामांची जाण असलेला माणूस म्हणून त्यांना तालुक्यातून पसंती मिळताना दिसत आहे. गायरानातील हा घराचा प्रश्न राज्यस्तरीय आहे, त्यामुळे विधिमंडळात ठराव करून तो सोडवावा लागेल. विधानसभेत पोहोचल्यानंतर निवासी घरे नावावर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितली. पुरंदर विधानसभेसाठी उभ्या असलेल्या तीनही उमेदवारांचे चेहरे पाहिले असता स्वच्छ चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे यांचेच नाव पुढे येते. तेव्हा त्यांच्या घड्याळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून संभाजीराव झेंडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आव्हान निरा मार्केट कमिटीचे सभापती शरद जगताप यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, दत्ता झुरंगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, ऋतुजा धुमाळ, सागर धुमाळ, आकाश धुमाळ, बिपिन शिंदे, राहुल कापरे, राहुल गायकवाड, वैभव वचकल, महेश धुमाळ, रामा धुमाळ, विकास हेंद्रे, मनोज कुंभार तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते वीर आणि पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.