दत्तात्रय कोंडे | राजगड न्युज
खेड – शिवापूर (वार्ताहर) दि.18 :- खेड शिवापुर ता. हवेली जि. पुणे येथील पी.आय.व्ही.मिशन मराठी मुलींची शाळा येथील इयत्ता-चौथी मराठी माध्यमच्या मुलांनी शनिवार दि.१६रोजी ‘आनंदबाजार’हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला.या उपक्रमात मुलांनी ज्वारी बाजरी तांदुळ गहु विविध प्रकारच्या डाळी फळे भाजीपाला फळभाज्या पालेभाज्या विविध खादय पदार्थ,दुधाचे पदार्थ , स्नॅक्स,हॅंडमेड डायरी,स्टेशनरी त्याचबरोबर मनोरंजन खेळाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उद्घाटन शाखा व्यवस्थापक मा.नाईक सर यांच्या हस्ते करण्यात आले.
आनंदमय वातावरणात ही चिमुकले खरेदी-विक्री करण्यात दंग झालेली दिसत होती.आनंदबाजारात मुलांबरोबर शिक्षकवर्ग आणि पालकवर्गही विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसत होते. भाजीपाला फळभाज्या फळे कडधान्य आदींची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली.
निसर्गाच्या सान्निध्यात झाडांच्या सावलीत मोठ्या आनंदाने वस्तूंची खरेदी-विक्री करताना प्लॅस्टिक पिशव्याच्या ऐवजी कापडी पिशव्यांचाच वापर करा असं कटाक्षाने सांगत पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश मुलांनी प्रत्यक्षात आपल्या कृतीतून दाखवून दिला .
उपक्रमातुन मुलांना पैशाचे व्यवहार कळाले.मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. खरेदी-विक्रि चा आनंद घेता आला. मुलांच्या सुप्त कलागुणांना चांगला वाव मिळाला.आनंददायी पद्धतीने ‘आनंदबाजार’ या उपक्रमात मुलांनी आपली भुमिका अगदी शिस्तबद्ध पद्धतीने,आनंदाने,उत्साहाने पार पाडल्याचे दिसून आले.त्यामुळे या बालचमुंचे कौतुक करावे तेवढे कमीच.इतकेच नाही तर ह्या मुलांनी आपल्या कष्टाची पहिली कमाई आपल्या आईवडिलांना दिली.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन इयत्ता-चौथी च्या वर्गशिक्षिका वर्षा संजय पवार आणि दानियल मोग्या गावीत यांनी अतिशय सुंदर व नियोजनबद्ध केल्याचे दिसून आले.मिशन शाळेचे शाखा व्यवस्थापक इझाक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हवेली तालुक्याचे केंद्रप्रमुख हनुमंत जाधव यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हा उपक्रम राबवू शकलो अशी माहिती वर्षा संजय पवार यांनी दिली.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुचित्रा गायकवाड आणि माझे सर्व सहकारी शिक्षकवर्ग यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मुलांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रितीने पार पडला .
जीवन कौशल्य अंतर्गत ‘व्यवहार ज्ञान’ या कौशल्याचे विकसन करण्याच्या दृष्टीने शाळेत बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले .आकडेमोड ,मापन याचे अचूक ज्ञान मिळावे , पावशेर, सव्वा किलो, अडीच किलो ,असे व्यवहारातील शब्दांचे ज्ञान व्हावे तसेच नफा तोटा खरेदी विक्री ही संकल्पना समजावी असा यामागचा हेतू होता.
विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.,’प्लास्टीक पिशवी टाळा व कागदी,कापडी पिशव्यांचा वापर करा ‘असा पर्यावरण पूरक संदेशही यावेळी देण्यात आला.
वर्षा संजय पवार – शिक्षक