खंडाळा : आजकाल शेती – संपत्तीच्या वादातून लोक आपली नाती विसरतात आणि एकमेकांच्या जीवावर उठतात. अशीच एक घटना खंडाळा तालुक्यातील घडली आहे. यामध्ये शेतीच्या झालेल्या वादातून आरोपीने आपल्या चुलत भावाची हत्या केली आहे.
अहिरे ता. खंडाळा येथे शेताच्या बांधावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ असलेल्या मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला.
याबाबत खंडाळा पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , अहिरे ता. खंडाळा येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे व संशयित ज्ञानेश्वर उर्फ नोण्या धायगुडे यांची शेती असुन या दोघांमध्ये शेताच्या बांधावरुन नेहमी वाद होतअसे. शनीवार दि. २३ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नोण्या धायगुडे याने कोरण्याचा प्रयत्न केला होता या दरम्यान मोहन धायगुडे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. यावेळी संशयित आरोपी नोन्या याने मोहन यास शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नसतो अशी धमकी दिली होती. दरम्यान हा घरगुती वाद संबधीत घटनेची कोणतीहि नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नोण्या धायगुडे व मोहन यांचे मध्ये गावाच्या पारावर भांडण झाले आणि झाली ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याने मोहन यास करित डोक्यात दगड घालुन खुन केला. या नंतर ज्ञानेश्वर उर्फ नोन्याने धायगुडे याने मोहन यास स्वताचे ट्रॅक्टरला असले ट्रॉली मधुन त्याची विल्हेवाट लावणे करीता व पुरावा नष्ट करणे करीता खंडाळा बाजुकडे घेवुन गेला. यानंतर पोलीसांनी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याला रस्त्यामध्ये ताब्यात घेतले. सदर घटनेची फिर्याद वैशाली मोहन धायगुडे यांनी दिली असुन अधिक तपास सपोनि विशाल वायकर करित आहेत.
ज्ञानेश्वर उर्फ नोन्या हा सुमारे सात ते आठ वर्षापुर्वी अहिरे येथील एका लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करित सदर मुलीचा मृतदेह निरा नदिच्या पात्रात फेकुन दिल्याच्या घटनेतील मुख्य संशयित आरोपी होता. हि घटना उघड झाल्या नंतर संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. तर पोलीसांना या घटनेचा तपास करणे आव्हानात्मक बनले होते. परंतु पोलीसांना घटना घडल्या नंतर काहि दिवसांनी यातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. परंतु सबळ पुराव्या अभावी नोन्याची न्यायालयातुन निर्दोष मुक्तता झाली होती.