कलानगरीः आज दि. १५ नोव्हेंबर रोजी बहुचर्चित कंगुवा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. कंगुवाचा ट्रेलर सगळ्यांनाच प्रभावित करणारा ठरला होता. त्यामुळे कंगुवाने एक प्रकारची वाईब सेट केली होती. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर कंगुवाने सेट केलेली वाईब दणकन आपटल्याचे प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रेयेवरून दिसत आहे. खरंतर रिलीजच्या आधी कंगुवाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. या सिनेमात प्रेक्षकांना या आधी न पाहिलेली क्रियेटीव्हीटी पाहिला मिळणार असल्याचा दावा दिग्दर्शक शिवा यांनी केला होता. कंगुवा पाहिलेल्या बहुतांशी प्रेक्षकांना सिनेमाचा प्लॅाट कथा खटकत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कुंगवा प्रामुख्याने वर्तमान आणि भूतकाळात चालणार सिनेमा आहे. वर्तमान काळात फ्रान्सिस आणि तब्बल हजार वर्षांपूर्वीचा कुंगवा ही दोन्ही पात्र साऊथचा सुपरस्टार सूर्याने केली आहेत. सूर्या हा खरतर साऊथचा मोठा स्टार असून, त्याचा या सिनेमातील अवतार जरी प्रभावित करणारा असला तरी भूमिकेच्या बाबतीत सूर्याला स्पेस मिळाली नसल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. सिनेमाची कथा कधी सुरू होते आणि कधी संपते हेच समजत नाही. तसेच बऱ्याच ठिकाणी सिनेमा रटाळ वाटतो. अर्धवट सिनेमा सोडून जावे असे देखील मनात येत असल्याची प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली. सिनेमा इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात प्रयोगशील सिनेमे येत आहेत. मात्र, सगळेच प्रयोगशील सिनेमे चालतील असे नव्हे, कारण प्रेक्षक हे अत्यंत सुज्ञ झाले असून त्यांना काय पाहिचं आहे आणि जे दाखविण्यात येत आहे त्यातील बारकावे प्रेक्षक टिपू लागला आहे. यामुळे सिनेमावर प्रयोग करताना प्रेक्षकांच्या तो पचनी पडला पाहिचे असा विचार आता दिग्दर्शकाने करायला हवा आहे.
सिनेमात बॅाबी देवल विलनच्या भूमिकेत असला तरी अॅनिमलमध्ये बॅाबीने साकारलेला अभिनय चांगला होता, अशी भावना प्रेक्षक सांगत आहेत. सिनेमाची एक जमेची बाजू म्हणजे सिनेमातील भव्य दिव्य सेट असून, पात्रांची वेशभूषा लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. अभिनेत्री दिक्षा पटाणीच्या अभिनयाची खल्ली देखील अनेक प्रेक्षकांनी उडवली आहे. एखादे पात्र ज्यावेळी अभिनय साकारत असते त्यावेळी त्या भूमिकेला त्या अभिनेत्याने वा अभिनेत्रीने न्याय द्यायला हवा असतो. मात्र दिक्षा पटानी अवघ्या काही काळ सिनेमात दिसते. तिचा वावर कृत्रिम पद्धतीचा असल्याचे प्रेक्षक सांगतात. तसेच दिशाने याअगोदर कल्की सिनेमात अभिनय केला होता. त्याला अभिनय म्हणावे का असा प्रश्न आहे. ते पात्र कल्कीमध्ये का दाखविण्यात आले हा देखील मोठा प्रश्न आहे. या सगळ्यावरून कंगुवा बॅाक्स अॅाफिसवर आपटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.