मराठी सिनेसृष्ठीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाता अधिराज्य गाजविणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. मराठीसह त्यांनी त्यांनी हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाची जादू प्रक्षकांच्या मनावर वठवली. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात मराठी नाटकांपासून केली. पुढे ते सिनेमात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कॅन्सरशी लढा सुरू होता.
त्यांची प्राणज्योत मालवली असून, ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरून निघणारी एका पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केले आहे. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही देखील काम केले आहे. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.