शिरूर तालुक्यातील जांबूत येथील निवृत्त माजी सैनिक श्रीराम दादाभाऊ गोरडे यांची कर सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.सैनिकांमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती, अथक परिश्रम,संघर्ष करण्याची तयारी असते. त्यातून चिकाटी व अथक परीश्रमात १७ वर्षे देशाची सेवा केली. देशसेवेतून निवृत्ती घेतल्या नंतर देखील संघर्ष सुरू ठेवला. त्यातून स्पर्धा परिक्षेला सामोरे जात अभ्यासू वृत्तीने त्यानी यशाला गवासनी घातली आहे.
जनतेची सेवा करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय सैन्य दलात जाण्याच्या निर्णयाचे सर्व कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. खूप परिश्रम केल्यानंतर सन २००५ मध्ये श्रीराम गोरडे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. त्यानंतर सतरा वर्ष देश सेवा करून निवृत्त झाल्यानंतर अजून काही तरी करावे. हा हेतू घेऊन पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी ते स्पर्धा परिक्षा देऊ लागले.