मुंबईः महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पी. व्ही. राधाकृष्णन यांना सत्तास्थानेचे पत्र दिले. यावेळी महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदारांच्या समर्थनांचे पत्र राज्यपाल यांना दिले. यामुळे आता राज्याचे तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या नामच्या समर्थनाचे पत्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिफारशीचे पत्र दिले. यामुळे आता उद्या दि. ५ डिसेंबर सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे.
सत्तास्थापनेचे पत्र राज्यपालांना पत्र दिल्यानंतर महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही पदे आमच्यासाठी तांत्रिक आहेत. आम्ही सर्वजण एकत्रित मिळून या अगोदर निर्णय घेतले आहेत. आता पुढेही आम्ही एकत्रित येत निर्णय घेणार असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच महायुतीच्या नव्या सरकारच्या नव्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे राहवे, अशी विनंती त्यांना केली आहे. त्यांना यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.