पिंपरी-चिंचवडः येथील देहरोड परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानीमध्ये एका तरुणाची मृतदेह आढळून आला होता. यामुळे येथे एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे वेगवान दिशेने फिरविण्यात आली. सदर मृतदेह हा अजय जोगिंदर लुक्कड या तरुणाचा असून, बहिणीसोबतच्या असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणाची हत्या भावाने केली असल्याचे पोलिसांना तपासात निषप्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गलगत असलेल्या देहूरोड परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी खदानीमध्ये एक मृतदेह आढळून आला. पोलिसांना तपासामध्ये सदर मृतदेहाची ओळख पटली असून, मयत तरुणाचे नाव अजय जोगिंदर लुक्कड असे आहे. अजयची हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि त्यानुसार तपासाला सुरूवात केली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता अजयचे आरोपी कुणाल चंदू सकट या तरुणाच्या बहिणीशी प्रेम संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली. बहिणीसोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या रागातूनच भाऊ कुणाल सकट याने इतर दोन साथदारांच्या मदतीने अजयला डोंगराच्या पायथ्याशी बोलवून खदानित ढकलून देऊन जीवे ठार मारल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, प्रेम सचिन मोरे आणि ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील कारवाई देहूरोड पोलीस करत आहेत.