शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी येथे राहणाऱ्या अल्पवयीन युवतीने दत्तनगर शिरवळ येथील अक्षय लांडगे व त्याच्या मित्रांविरोधात विनयभंग व पोस्को कायद्या अंतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता तरीही दहा ते पंधरा च्या दिवसांच्या आतच आरोपी जामेनावर सुटले होते जामीनावर सुटल्याबरोबर आरोपींनी दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरासभोवती मोटरसायकलवर गिरट्या घालण्यास सुरुवात केली होती त्यामुळे भीती व नैराश्यपोटी सदर युवतीने दि १६ रोजी पहाटेच्या सुमारास राहते घरी साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली होती.
सदर घटनेचे पडसाद आजही शिरवळ मध्ये उमटले सर्व सांगवी व पंचक्रोशीतील महिला मुले ग्रामस्थांनी शिरवळ पोलीस स्टेशनला आंदोलन करीत आक्रमकतेने आपल्या मागण्या मांडल्या. सदर घटनेची राज्य महिला आयोगाने ही गांभीर्याने दखल घेत कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमीत अल्पवयीन युवतीवर न्यायासाठी आत्महत्या करण्याची वेळ आल्याने सांगवी ग्रामस्थांनी शिरवळ पोलीस ठाणे धाव घेत आंदोलन करीत आक्रमकतेने पोलीस प्रशासनाला जाब विचारला. तसेच या गुन्ह्यातील तपासी अधिकारी वृषाली देसाई व सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस ठाण्यात यावे अन्यथा ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचे ठामपणे जाहीर केले. न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांच्या वतीने ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिनी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते.
तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांचेवर गंभीर आरोप
अल्पवयीन युवतीने दाखल केलेल्या केसमधील साक्षीदार व युवतीच्या आईने तपासी अधिकारी वृषाली देसाई यांचेवर गंभीर आरोप केले आहेत. तपासी अधिकारी यांनी सौम्य कलमे लावून तपासात हलगर्जीपणा केल्याने विनयभंग व पोस्को सारखा गंभीर गुन्हा दाखल असतानाही पंधरा दिवसाच्या आतच आरोपी जामिनावर सुटला त्यानंतर आरोपी तिच्या घराबाहेर मोटरसायकलवर फिरत असल्याबाबत व त्यामुळे मुलगी घाबरत असल्याचे तपासी अधिकारी देसाई मॅडमला मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले. त्याचवेळी मॅडमने आमच्याकडे कोर्टाचे कोणतेही कागदपत्रे आले नाही तसे सांगून वेळ मारून नेली तपासी अधिकारी यांच्या हलगर्जी पणा मुळेच आरोपींच्या दहशतीला घाबरून युवतीने आत्महत्या केल्याने तपासी अधिकारी यांना समोर बोलावून त्यांचे वर रीतसर कारवाई करण्यासाठी जमाव आक्रमक बनला होता.
शिरवळ व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय कबूले, माजी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शिवसेना (उ. बा. ठा ) जिल्हा समन्वयक रामदास कांबळे तालुकाप्रमुख आदेश जमदाडे , शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, माजी पंचायत समिती सभापती गुरुदेव बरदाडे यांनीही उपस्थित ग्रामस्थ व पोलीस अधिकाऱ्यांसमोर प्रश्नाचे सरबत्ती करीत तक्रारींचा पाढा वाचत शिरवळ भयमुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसण्याचे आवाहन केले. अवैध धंद्यामुळे गुंडगिरी बोकळली असून पोलिसांचा वचक नसल्याचा आरोप उपस्थित त्यांनी केला.
अखेर पोलिसांनी संबंधित दोन युवकांसह एक अल्पवयीन युवकावर कायदेशीर कारवाई करीत मुलीचे वडील मच्छिंद्र लोखंडे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक चिमाजी केंद्रे करीत आहे.
राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी ट्विट
राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी ट्विट करीत सदर प्रकरणी राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत असत पोलीस महासंचालक यांना तपास करावा तसेच पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतरही मुलींना असुरक्षित वाटत असेल तर हे नक्कीच पोलीस यंत्रणेचे अपयश आहे याप्रकरणी पोलीस अधीक्षक सातारा यांचे कडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ मागवणे आला असून स्वतः तपासी अधिकारी व यंत्रणेच्या संपर्कात राहून पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.