सासवडः २९ अॅाक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर ३० अॅाक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. ४० उमेदवारांनी नामनिर्देश अर्ज दाखल केले होते, यापैकी ७ उमेदवारांचे अर्ज छाननीच्या वेळी काही गोष्टींची पूर्तता होत नसल्याने अपात्र ठरण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडून अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे महायुतीतून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे) या पक्षांच्या वतीने बहुसंख्य उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे त्याच बरोबर दत्ता झुरुंगे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उमेदवार अर्ज भरला होता. ए बी फॉर्म न मिळाल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालिंदर कामठे आणि संदीप उर्फ गंगाराम जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांचे देखील उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाने अवैध ठरवले आहेत. त्याचबरोबर बळीराम सोनवणे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी देखील एबी फॉर्म सादर करता आला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.
गंगाराम सोपान माने यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना देखील एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्याचबरोबर शंकर बबन हरपळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना देखील उमेदवार एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. एकूण ३३ अर्ज वैद्य ठरवण्यात आले आहेत. याबाबतची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
अर्ज वैद्य ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची नावेः
- अतुल महादेव नागरे
- दिलीप विठ्ठल गिरमे
- संभाजी सदाशिव झेंडे
- संभाजी सदाशिव झेंडे
- संभाजी सदाशिव झेंडे
- गणेश बबनराव जगताप
- विजय सोपानराव शिवतारे
- जालींदर सोपानराव कामठे
- संजय चंद्रकांत जगताप
- उत्तम गुलाब कामठे
- उत्तम गुलाब कामठे
- शेखर भगवान कदम
- विशाल अरूण पवार
- शंकर बबन हरपळे
- दत्तात्रय मारुती झुरंगे
- सुरज संजय भोसले
- अनिल नारायण गायकवाड
- संदीप ऊर्फ गंगाराम मारुती जगदाळे
- अभिजीत मधूकर जगताप
- संदीप बबन मोडक
- संजय चंद्रकांत जगताप
- उमेश नारायण जगताप
- संजय चंद्रकांत जगताप
- संजय शहाजी निगडे
- कीर्ती श्याम माने
- आकाश विश्वास जगताप
- सुरज राजेंद्र घोरपडे