मुंबईः महायुतीमधील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल पीव्ही राधाकृष्णन यांनी तिघांनाही गोपनेतेची शपथ दिली. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १९ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खासदार आमदार उपस्थित होते.
तसेच या उपस्थितांमध्ये गृहमंत्री अमित शहा, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडगरी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यासह सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, अंबानी कटुंबयीय, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हे देखील उपस्थित होते.
मंत्र्यांचा शपथविधी नाही
या शपथविधी सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ ग्रहण केली. महायुतीतील मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम यावेळी झाला नाही. यामुळे मंत्रीपद वाटपावरून मोठी रस्सीखेच अजूनही महायुतीमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता मंत्र्यांचा शपथविधी सोहळा समारंभ कधी पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.