पिंपरी चिंचवडः लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने पत्नी व मेव्हन्याच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ नोव्हेंबरच्या दिवशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारा प्रियकर आणि त्याच्या प्रेयसी यांच्यात वाद झाले. या वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीचा जीव घेतला. ही घटना पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकर, त्याला साथ देणारी पत्नी आणि मेहुण्याला अटक केली आहे. यश्री मोरे (वय २७ वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकर आरोपी दिनेश ठोंबरे, त्याची पत्नी आणि मेहुणा अविनाश टीळे यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर या दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मयत महिला आणि आरोपी दिनेश यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यात हातोडीने हल्ला केला. या घटनेत जयश्री यांचा मृत्यू झाला.
….आणि पत्नी व मेहण्याच्या मदतीने मृत्यदेहाची लावली वेल्हेवाट
जयश्री यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी दिनेशने आरोपी पत्नी आणि मेहण्याची मदत घेतली. सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात महिलेचा मृतदेह फेकून दिला. दुसऱ्या दिवशी प्रेयसी हरवली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. या घटनेचा पोलिसांनी तपास केला त्यावेळी या गुन्ह्यात प्रेयकरानेच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा सखोल तपास पोलिसांनी केला असता मयत महिला आरोपी दिनेश याच्याकडे पैशांची मागणी करीत होती. तसेच पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याची देखील मागणी करीत होती. तसेच मयत महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला आरोपींनी आळंदीत सोडून दिल्याची बाब देखील पोलीस तपासात उघड झाली आहे.