भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित
भोर तालुक्यातील विविध संघटना मराठा आरक्षणाच्या चाललेल्या आंदोलनास व साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देत आहेत.अशातच भोर तालुक्यातील वकील संघटनेने साखळी उपोषणात आपली उपस्थिती दाखवुन आपल्या भावना व्यक्त करत आपला जाहीर पाठिंबा मंगळवार ( दि.३१) उपोषण स्थळी दर्शवत पाठिंब्याचे जाहीर पत्र सकल मराठा समाजाचे भोर तालुक्याचे अध्यक्ष संजय भेलके व पदाधिका-यांना सुपुर्त केले.
वकील संघटनेच्या वतीने एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच ,बघताय काय सामील व्हा,अशा घोषणा देत संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व मराठा आरक्षण आंदोलनास व साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी भोर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शांततेच्या आणि सनदशीर कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.