शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख
कान्हुर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी येथील माळरान डोंगरावर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून जलसंसाधनचा विकास व व्यवथापन प्रकल्पाच्या उपक्रमांतर्गत देशी झाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले. यामुळे आता येथील माळरान डोंगर देशी झाडांनी फुलणार आहे. येथील गारकोलवाडी माळरान डोंगराची नुकतेच मृद व जलसंधारण, शेती विकास, महिला विकास, उपजीविका आधारित उपक्रम राबवणाऱ्या वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून डच बँकच्या अर्थसाह्यातून जलसंसाधनचा विकास व व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंतर्गत निवड करण्यात आली आहे.
त्या माध्यमातून जल संधारण, सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, जाळी बंधारे, कोरवाल बंधारे व लाभार्थी गटाची स्थापना करणे, सूक्ष्म व तुषार पद्धतीचा अवलंब करणे यांसह शेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे यांसारखे उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच येथील डोंगरावर उपस्थितांच्या माध्यमातून सिताफळ, चिंच यांसह आदी देशी झाडांच्या बियांची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, उपस्थितांचा माजी सरपंच अनिल शिंदे, समाजसेवक शहाजी दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वॉटर संस्थेचे संस्थेचे अधिकारी संदिप गायकवाड व प्रकल्प प्रमुख उत्तम दुबे आणि बस बॅक टिमचे अशिशकुमार साहो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.