निसर्गराज मादगुडे: राजगड न्युज
भोर : ध्येय अभ्यासिकातर्फे भोर मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये मुंबई पोलिस ,पुणे ग्रामीण पोलिस, एसआरपीएफ मध्ये भरती झालेल्या 12 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
तुषार गोळे, संतोष साळुंखे, शेखर अवसरे अमर वालगुडे, विपुल खोपडे, वैभव मांढरे, श्रद्धा कोठावळे, संकेत देवगिरकर हे विद्यार्थी मुंबई पोलिस मध्ये भरती झाले असून अनिकेत कुंजीर व अजिंक्य चंदनशिव हे एसआरपीएफ मध्ये भरती झाले आहेत. तसेच तेजस शिवतरे पुणे ग्रामीण पोलिस व प्रकाश कंक हे रत्नागिरी पोलिस मध्ये भरती झाले आहेत.
या सत्कार प्रसंगी बोलताना किरणकुमार धनवाडे यांनी आपला जीवनप्रवास सांगितला. सामान्य परिस्थितीतून यशस्वी होण्यापर्यंत जी परिस्थिती असते तिला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्याना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमासाठी पालक , विद्यार्थी , अभ्यासिकेच्या संस्थापिका पौर्णिमा जावीर, स्वप्निल जावीर, जयराज कारंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जानकर यांनी केले .अभ्यासिके मध्ये गरजू व होतकरू मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.