खडकवासलाः निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार असल्याचे विधान खा. सुप्रिया सुळे यांनी येथे आयोजित सभेत केले. सुळे या आज दि. ८ नोव्हेंबर सकाळपासून आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत हजेरी लावून आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. खडकवासला विधानसभेत आघाडीच्या वतीने म्हणजे राष्ट्रवादी शर पवार गटाच्या वतीने भाजपच्या भीमराव तापकीर यांच्या विरोधात सचिन दोडके हे मैदानात आहेत. यावेळी आयोजित केलेल्या सभेतून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागत निवडणुका झाल्यावर केस करणार असल्याचे सांगितले.
राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवण्यात येते. पण हा देश संविधानावर चालतो. जातीपातीमध्ये तेढ निर्माण केले जात आहे. आघाडीचे आपण सगळे एकत्रित येत आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहोत. मात्र तिकडे तसे नाही, त्यांच्यामध्ये सिलेक्टिव्ह गोष्टी केल्या जात आहेत. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचीसाठीची वैचारिक लढाई असल्याचे सुळे यांनी यावेळी बोलताना अधोरिखित केले. तसेच सचिन दोडके येथून निवडून आल्यावर वारजे आणि इथले भागात कोणी गाडीवर बुंदुक घेऊन फिरणार नाही, असे वचन त्यांच्याकडून घेणार असल्याचे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
आबांचे कौतुक, दादांना चिमटा
दिवंगत आर. आर. आबा हे राज्याचे गृहमंत्री असताना या गोष्टी घडल्या कधी, असा सवाल सुळे यांनी उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले. यामुळे जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आर. आर. आबा यांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. एक टॅगलाईन सध्या फिरत आहे, बळ आणि लाभ. राजकारण हे कधीच लाभासाठी नसते. बळ हे कुणाला देणार यांचे काही माहिती नाही. बळ मलिदा गँग असल्याची घणाघाती टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली.