नवी दिल्लीः ५ डिसेंबरच्या दिवशी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आणि मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेत राज्याचा गाडा हाकण्याचे ठरवले. मात्र, मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांनी संसद भवनात येत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ऊस प्रश्नाबाबत चर्चा केली असल्याचे देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
साहेबांना दिल्या शुभेच्छा
राजकीय हवेदावे बाजूला सारून अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांचा आज दि. १२ डिसेंबर रोजी ८४ वा वाढदिवस असून ते आजपासून ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. अजित पवार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी राजसभा खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार तसेच जेष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते.