रस्त्यावर वाहून आले दगड धोंडे मातीची ढिगारे, वाहतूक ठप्पभोर
भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर: तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्यातच भोरच्या दक्षिणेकडील भोर- मांढरदेवी आंबाडखिंड घाटात मागील दोन दिवसापासून दिवस -रात्र पडत असलेल्या पावसाने आपले रौद्ररूप दाखवत ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे रस्त्यावर डोंगरावरून दगड, माती ,चिखल वाहून आले आहे. रस्त्यावर जागोजागी मातीचे ढिगारे ,पाण्याचे तळे ,चिखल, असा चिखलमय रस्ता झाला आहे. सदर रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून या रस्त्यावरील मातीचे ढिगारे , दगड, धोंडे लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने दूर करावे अशी मागणी वाहतूकदार, प्रवाशांकडून होत आहे.
भोर मांढरदेवी मार्गावर जाताना प्रवाशांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.