भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले .
घरपट्टी करवाढी विरोधात मोर्चा
भोर : नगरपरिषदेच्या प्रशासनाने शासकीय नियमानुसार जी चालू वर्ष घरपट्टी कर वाढ केलेली आहे त्या संबंधित शहरातील सर्व घरपट्टी मालमत्ता धारकांना ज्या सुधारित नवीन घरपट्टी करवाढ नोटीसा पाठवल्या आहेत त्याचाच निषेध म्हणून गुरुवार (दि १२ ) सकाळी १० वाजता भोर शहरातील एसस्टी स्डॅंड ते नगरपालिका कार्यालयापर्यंत शहरातील नागरिकांचा धडक मोर्चा निघणार आहे.
सदर मोर्चा नगरपरिषदेच्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी व नागरिकांच्या म्हणण्यानुसार दिलेली अन्यायकारक घरपट्टी करवाढ रोखण्यासाठी आयोजित केला आहे.जुनी घरपट्टी करू लागु करा व नवीन दिलेली घरपट्टी रद्द करा अशी मागणी प्रामुख्याने या मोर्चात असणार आहे.अशा आशयाचे धडक मोर्चाचे परिपत्रक सर्वत्र प्रसारित केले आहे.
या धडक मोर्चात नागरिक किती प्रमाणात सहभाग घेतात? या मोर्चाचा प्रभाव नगरपरिषदेच्या प्रशासनावर पडणार का? किती टक्के घरपट्टी करवाढ नगरपालिका कमी करणार? जुनी घरपट्टी पुन्हा लागु करणार का? भोरमधील जनतेने निवडून दिलेले नगरसेवक लोकांना सहकार्य करणार का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे उद्याच्या मोर्चात नागरिकांना मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच नगरपालिकेनी केलेली घरपट्टी करवाढ ही भोरच्या जनतेत प्रचंड असंतोष पसरवत आहे असे दिसत आहे.