बाळु शिंदे: राजगड न्युज नेटवर्क
नसरापूर: कांबरे खे.बा ता.भोर येथे शेतात येणाऱ्या जनावरांच्या सौरक्षणासाठी तारेचे कुंपण करून त्यामध्ये करंट सोडण्यात आला होता परंतु तोच तारेचा करंट लागून कांबरे येथील प्रथमेश देविदास शेलार ( वय 23) यास लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबरे ता भोर येथील दयानंद बबन शेलार यांनी आपल्या शेतामध्ये जनावरे येऊन नुकसान करतात या बचावासाठी शेतात तारांचे कंपाऊंड करून त्यामध्ये करंट सोडण्यात आला होता तो करंट
एखादयाला लागुन मृत्यू येईल याची जाणीव असताना शेलार याने तारांमध्ये करंट सोडला. तो करंट प्रथमेश देविदास शेलार वय 23 वर्ष रा. कांबरे खे. बा. ता. भोर जि.पुणे यास लागला व त्यात तो मरण पावला आहे.
दयानंद बबन शेलार रा. कांबरे खे.बा.ता.भोर जि.पुणे हा या साठी कारणीभुत असल्या कारणाने त्यांच्यावर राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दखल करण्यात आला असून या बाबत फिर्याद देविदास केशव शेलार वय 55 वर्षे रा. कांबरे खे.बा.ता.भोर जि. पुणे यांनी दिली असून
पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुतनासे करीत आहेत.