सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा: सातारा जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रक व टेम्पो मधून डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडली असून या कारवाईत चार संशयित पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकूण ४,५१,५६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पाचवड गावच्या हद्दीत पुणे ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चे सव्हिस रोडवर मारुती सुझुकी स्विफ्ट क्र. एम. एच. ४३. ए. एन. ७७९१ मधून काही व्यक्ती महामार्गावर जाणाऱ्या वाहनांना थांबवून डिझेल खरेदी करावयाचे आहे काय ? असे विचारत आहे. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांचे विशेष पथकास प्राप्त बातमीचे ठिकाणी जावून नमुद स्विफ्ट कार व इसमांना ताब्यात घेवून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने प्राप्त बातमीचे ठिकाणी जावून नमुद वाहन व ४ इसमांना ताब्यात घेवून त्यांचे ताच्यात मिळून आलेल्या डिझेलच्या कॅनबाबत विचारपूस केली असता त्यांनी कॅनमधील डिझेल त्यांनी भुईज गावच्या हद्दीतील प्रतापगड दाव्याचे समोर उभ्या असलेल्या टेम्पोमधून चोरी करुन विक्री करण्याकरीता आणले असल्याचे सांगीतले. तसेच त्यांना आणखी विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी महिन्यापूर्वी शिरवळ येथून उभ्या असलेल्या डंपरमधून देखील डिझेल चोरी केले असल्याचे सांगीतल्याने भुईंज पोलीस ठाणे, शिरवळ पोलीस ठाणे असे दोन डिझल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच नमुद आरोपींच्याकडून डिझेल चोरी करण्याकरीता वापरलेले वाहन चोरी केले डिझेल, मोबाईल हॅन्डसेट असा मिळून एकूण ४,५१,५६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद चेचले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साळूंखे, सनी आवटे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, सचिन ससाणे, शिवाजी गुरव केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.