साताराः माण तालुक्यातील बनगरवाडी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटाच्या दोन चिमुकल्या मुलीला जन्मदात्या आईने पोटाला बांधून तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी एका विवाहित महिलेले तिच्या दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारुन आत्महत्या केली असून, एक सहा वर्ष आणि एक तीन महिन्याची मुलगी पोटाला बांधून तिने तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केला. महिलेच्या मृत्यूची खबर तिच्या पतीला मिळताच त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याला वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला तीन मुली होत्या. त्यापैकी एक तीन वर्षांची मुलगी तिच्या आजीजवळ झोपली होती. महिलेला एकाच वेळी तीनही मुलींना घेऊन जाता येत नसल्याने तीन वर्षांच्या मुलीला तिने तिथेच ठेऊन इतर दोन चिमुकल्यांना पोटाला बांधून तलावात उडी घेत जीवन संपवले आहे.