चेन्नई: चेन्नईतल्या थोरईपक्कम येथे एक भयंकर घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एक इंजिनिअर तरुणाने घरी कोणी नसताना कॅाल गर्लला घरी बोलावले. तिच्या बरोबर त्या रात्री शरीरसंबध प्रस्थापित केले. त्यानंतर त्या महिलेची निर्घूणपणे हत्या केली. बरं हा तरुण हत्या करुन थांबला नाही, तर त्याने मयत महिलेच्या शरीराचे तुकडे करुन एका बॅगमध्ये भरुन ती बॅक इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सोडून दिली.
महिलेच्या डोक्यात रागाच्या भरात केला हातोड्याने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर असलेल्या २३ वर्षीय एम मणिकंदने याने घरी कोणी नसल्याने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क सांधून, ३५ वर्षीय कॅालगर्लला घरी बोलावले. तिच्यासोबत रात्रभर शरीरसंबंध प्रस्तापित केले. त्यानंतर महिलेने एम. मणिकंदन याच्याकडे पैशांची मागणी केली. पैशांवर दोघांमध्ये भांडण झाले. पुढे जाऊन हे भांडण अधिक तीव्र बनले. याचवेळी एम. मणिकंदन याचा पार चढला आणि रागाच्या भरात त्याने या महिलेच्या डोक्यात हतोड्याने वार केला. हा वार इतका जोरदार होता की, या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेहाचे तुकडे करुन बॅगेत भरुन फेकून दिले
यानंतर महिला घरी आली नाही म्हणून तिची शोधाशोध करण्यात आली. तिच्या भावाने पोलिसांत धाव घेत तिची हरवल्याची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली. महिलेच्या फोन ज्या ठिकाणी बंद झाला होता, त्या ठिकाणचा शेवटच्या कॅाल ट्रेस करुन पोलीस त्या ठिकाणी पोहचले. पोलिसांना त्या ठिकाणी एक बॅग मिळून आली. त्या बॅगेत महिलेचा तुकडे केलेला मृतदेह पोलिसांना मिळवला. या मृतदेहाची ओळख पटली आणि हा मृतदेह तिचाच असल्याचे भावाने सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. काही लोकांची चौकशी देखील करण्यात आली. आरोपीला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या चौकशीत एम. मणिकंदनपर्यंत पोलीस पोहचले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कुबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.