राजगड न्युज नेटवर्क
खेड शिवापूर : सातारा पुणे महामार्गावर खेड शिवापूर या ठिकाणी गुटका विक्री साठी आलेल्या पुणे येथील पती पत्नीला अटक करण्यात आली असून ईश्वर वसना भारती वय 30 वर्ष व त्याची पत्नी दोघे सध्या रा. गुजरवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खेडशिवापुर या ठिकाणी असणारे प्रदीप कांबळे यांना हॉटेल इंडीयाना टपरीजवळ दोन व्यक्ती संशयास्पद दिसून आल्या त्यांनी विचारणा केली असता विमान पान मसाला विकण्यासाठी आले आहेत हे समजले त्यांनी राजगड पोलिसांना या बाबत खबर दिली त्यानुसार ईश्वर वसना भारती वय 30 वर्ष व त्याची पत्नी दोघे सध्या रा. गुजरवाडी हे त्याचे जवळ असलेल्या होंडा कंपनीच्या अॅक्टीवा गाडीवर दोन बॅगेमध्ये असलेल्या विमल व आर. एम. डी. पान मसाल्याच्या 71 पैकेट व दुस-या बेंगमध्ये आरएमडी पान मसाल्याचे 10 पॅकेट, एक अॅक्टिवा गाडी व मोबाईल असा एकूण रक्कम रूपये 37620/- चा पान मसाला टपरीवाल्यानां विक्री करण्यासाठी घेवुन आला असल्याचे सांगितले त्यानुसार सदर पान मसाला(गुटखा) जन आरोग्यास हानीकारक आहे व त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे या कारणाने त्याचे विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमाचे २०११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे करीत आहेत. तर फिर्याद सामाजिक कार्यकर्ती प्रदीप कांबळे यांनी दिली आहे.