भोर: तालुक्यातील बालवडी गावात एका विचित्र घटनेत, अंत्यविधीच्या वेळी अर्धवट जळालेल्या मयताची विटंबना करण्यात आली. या घटनेने संतापलेल्या जमावाने हेळसांड करणाऱ्या व्यक्तीचे हॉटेल जाळून टाकले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी भोर पोलिसांनी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार,बालवडी गावात महिलेचे नुकतेच निधन झाले होते.अंत्यसंस्कार झाल्या नंतर काही वेळाने गावातील प्रकाश सदाशिव बढे रा.नेरे या व्यक्तीने अर्धवट जळलेल्या मृतदेहाची जळत असलेल्या ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी फेकून देत मृतदेहाची विटंबना केली केली.विटंबना झाल्याची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बढे यांच्या हॉटेलवर हल्ला केला. हल्ल्यात हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे.तर त्या बढे यांना देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवार, मपो करपे,पोह गायकवाड,विकास लगस व इतर पोलिस कर्मचारी दाखल झालेपोलिसांनी बढे यांना ताब्यात घेतले असून उपचारासाठी भोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन केला आहे.तसेच घटनेची नोंद भोर पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली असून पुढील कारवाई भोर पोलिस करीत आहेत.