शिरुरः पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (mangaldas bandal) यांच्या घरावर पुन्हा ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर त्या संबधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चार वर्षांमध्ये ही ईडीची दुसरी कारवाई असून मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याच्या चर्चांना परिसरातून उधान आल्याचे पाहिला मिळत आहे. त्यांच्या पुणे शहरातील हडपसर आणि शिक्रापूर येथील निवासस्थानी धाड टाकल्याचे समजते. तसेच या कारवाईमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य घरातच असल्याची माहिती आहे. बांदल यांचे भाऊ आणि पत्नी शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत. तर हडपसर येथील निवासस्थानी स्वःताह बांदल आणि त्यांचे पुतणे आहेत.
त्यांच्या घरांवर ईडीची कारवाई होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तालुक्यात चर्चांना उधाण मिळताना दिसत आहे. मात्र, अद्यापर्यंत ईडीने या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही. मंगलदास बांदल हे लोकसभेसाठी इच्छुक होते. तर आता ते विधानसभेसाठी चाचपणी करीत असल्याचे बोलले जात आहे. ते एका बँकेच्या प्रकरणावरुन जामिनावर बाहेर आले आहेत. तर विधानसभच्या निवडणुकीवर हा विरोधकांचा डाव असल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.