काेंढवाः गेल्या काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सर्वच स्तरावरून या गोष्टीवर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. मध्यरात्री साधारण १२ ते १ च्या वाजण्याच्या सुसारास बोपदेव घाटात असलेल्या पोलीस मदत केंद्राच्या काही अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी पीडित युवतीवर सामूहिक बलात्कार करण्याता आला. त्यावेळी पीडितेच्या मित्राना नराधमांना झाडाला बांधून ठेवले होते. तसेच त्याला आणि पीडित तरुणीला देखील त्यांनी मारहाण केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून घटनास्थळाची पाहणी करून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली. यामुळे पुणे शहरात आणि मुली सुरक्षित आहेत का आणि बोपदेव घाट प्रवासासाठी असुरक्षित बनलाय का असे प्रश्न या संतापजनक घटनेमुळे निर्माण झाले आहेत.
माध्यमांंनी या घटनेची दखल घेत घटनास्थळावरून ग्राऊंड रिपोर्टिंग केले. यामध्ये दोन प्रसिद्ध चॅनेलच्या प्रतिनिधींनी सविस्तर वार्तांकन करताना त्या ठिकाणीची एकूण परिस्थिती मांडली. यामध्ये घटना घडून गेली तरी प्रेमी युगले या ठिकाणी दिसत होती. पोलीसांनी बरिर्गिंटिक केले असले तरी अनेक जण त्या ठिकाणी येत होते. पोलिसांकडून शोध घेतला जात असला तरी, या ठिकाणी खरतर पोलीस असणे गरजेचे आहे, असे या प्रतिनिधिंनी सांगितले. यानंतर पोलीस या ठिकाणी थांबताना दिसत आहे.
पोलीस मदत केंद्र नावापुरतेच का?
ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या काही अंतरावरच पोलीस मदत केंद्र आहे, मात्र हे पोलीस मदत केंद्र केवळ नावापुरतेच आहे का असा प्रश्न या घटेनेच्या निमित्ताने अधोरिखित झाला आहे. याच ठिकाणी या घटनेच्या आदल्या दिवशी एका तरुणीचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.
आरोपींवर १० लाखांचे बक्षीस
या घटनेतील संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांमार्फत त्यांच्या माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच कित्येक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलिसांनी केली. त्यातून या तीन संशयित आरोपीं असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलेल्या वर्णानानुसार तीन संशियत आरोपींचे स्केच रेखाटण्यात आली होती. हे स्केचेस सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी आरोपींवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अद्यापही आरोपी मोकाट
पोलिसांनी या संशयित आरोपींवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच आरोपींचा शोध घेतला जात आहे. गुन्हेगारांची देखील कसून चौकशी केली जात आहे. असे असताना पोलिसांच्या हाती सीसीटाव्ही फुटेज शिवाय ठोस पुरावा मिळालेला नाही. यामुळे राज्यातून या प्रकरणावरुन रोष व्यक्त केला जात आहे.
घटनेनंंतर पोलीस केंद्रात
या घटनेमुळे पोलीस मदत केंद्रात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे.
चोऱ्यामाऱ्या लूटमार या घटना नेहमीच्याच
सासवडमधून पुण्याच्या दिशेने जाणारे दोन रस्ते आहेत. एक म्हणजे दिवेघाट मार्गे हडपसरमधून पुण्यात. दुसरा म्हणजे बोपघाट मार्गे पुण्यात. बोपदेव घाट हा खरंतर निसर्गाने वेढलेला आहे. येथून पुणे संपूर्ण शहर पाहता येते. या घाटातील रस्ता छोटा असून, या ठिकाणी वेडवाकडी वळणे असल्याने छोटे मोठे अपघात घडतच असतात. रात्रीचा फायदा घेत घाटातून जाणाऱ्यांकडून पैसे लुटले जातात. मारामारी केली जाते. लूटमार केली जाते. यामुळे या घाटातून प्रवास सुखकर होऊन आपण पुण्यात लवकर पोहचू या आशेने जाणाऱ्या काही प्रवाशांसोबत अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळेच या ठिकाणी पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले. मात्र तरी देखील पोलीस या ठिकाणी नसतात असे या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत बोलताना समजले.
घटनेतील २ संशियत आरोपींना पोलिसांनी नागपूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच या घटनेतील तिन्ही आरोपींना सायंकाळपर्यंत पोलीस पुण्यात आणतील असे देखील समजते आहे. या तिन्ही आरोपींकडून पुणे पोलीस कसून चौकशी करून माहिती देणार असल्याची माहिती मिळत आहे.