देशातील पहिले पुस्तकांचे गाव असलेल्या भिलार येथील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाल्याने भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या भर वस्तीतून रस्त्याकडेला ठेवलेली गॅस टाकीच चोरून नेली.
भिलार (ता.महाबळेश्वर) येथील सांस्कृतिक हाॅल समोर असलेल्या एका दुकानासमोरील गॅसची टाकी अज्ञाताने शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी चारच्या सुमारास लंपास केल्याची घटना उघडकीस आली. निलेश दत्तात्रय भिलारे यांनी गणेश विसर्जनादिवशी दुपारी दोन वाजता टाकी भरून घेतली. (Pachgani News) त्याऩंतर ते गणपती मिरवणुकीस जाऊन परत आले असता त्यांना आपली गॅसची टाकी गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता टाकीबाबत कसलीही माहिती मिळाली नाही. याअगोदरही या परिसरातून गॅसची टाकी लंपास करण्याचे प्रकार घडले आहेत.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							









