भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून, या यादीत नव्या जुन्या चेहऱ्यांचा मेळ घालत संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ नव्या चेहऱ्यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. यात अनेक आमदारांची तिकीटे कापून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मराठा आंदोलन आणि डीएमके फॅक्टरमुळे भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देत मैदानात उतरले असल्याचे बोलले जात आहे. तसेच या यादीत संबंधित विधानसभेतील आदारांच्या मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
या यादीमध्ये ९९ पैकी १३ महिलांना संधी मिळाली आहे. तसे पाहिल्यास महिलांना ३३ टक्के आरक्षण असताना केवळ १३ महिला उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे.
महिला उमेदवारांची नावे
१ कल्याण पूर्व – सुलभा काळू गायकवाड
२ बेलापूर – मंदा म्हात्रे
३ दहिसर – मनिषा चौधरी
४ गोरेगाव – विद्या ठाकूर
५ चिखली – श्वेता महाले
६ भोकर – श्रीजया चव्हाण
७ जिंतूर – मेघना बोर्डीकर
८ नाशिक पश्चिम – सीमा हिरे
९ फुलंब्री – अनुराधा चव्हाण
१० नाशिक पश्चिम – सीमा हिरे
११ पर्वती – माधुरी मिसाळ
१२ श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
१३ केज – नमिता मुंदडा