पुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी व ३ मोबाईल असा एकूण मिळून ५६ लाख ९२ हजार किंमतीचा मुद्देमाल कारवाईमध्ये हस्तगत केला आहे. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत कामशेत ता. मावळगावच्या हद्दीतून जुन्या महामार्गाकडून ताजे गावाच्या दिशेने लोणावळ्याकडे ४ इसम एका चारचाकी वाहनामधून गांजा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर कारवाई केली आहे.
या प्रकरणी अभिषेक अनिल नागवडे वय २४, प्रदिप नारायण नामदास वय २५ वर्षे, योगेश रमेशलगड वय ३२ वर्षे, वैभव संजीवण्न चेडे वय २३ वर्षे, सर्व राहणार कारेगांव ता. शिरूर यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळाकडे ४ इसम एका चारचाकी वाहनामधून गांजां या अंमली पदार्थाची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलसांची दोन पथके तयार करून सापळा लावला आला. जुन्या हायवे रोडने ताजे गावाकडे येताना पांढऱ्या रंगाची वेरना पोलिसांना दिसली. त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे छापा टाकून कारची व डिकीची पाहणी केली असता, डिकीमध्ये एकूण ९८ किलो वजनाचा गांजा आंमलीपदार्थ आढळून आला.
त्यावरून सदर इसमांवर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क) २० (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदर रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांच्या पथकाने केली आहे.