भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोरला चौपाटी -रामबाग रस्त्यालगत वर्दळीच्या मार्गावर असलेल्या अविनाश पवार यांच्या जागेत असणाऱ्या अंबिका हार्डवेअर ॲन्ड इलेक्ट्रिकल्स स्टोअर्स दुकानात ,दुकानच्या पत्रा कापुन चोरी झाल्याची घटना रविवारी (दि.३१) पहाटे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार भोरमधील चौपाटी रामबाग रस्त्यावर एचडीएफसी बँकेसमोर अंबिका हार्डवेअर ॲन्ड इलेक्ट्रिकल्स स्टोअर्स हे दुकान आहे. दुकान जागा मालक अविनाश पवार यांनी हे दुकान गोपाळ राजपुत,चेतन राजपूत या व्यावसायिकाला भाड्याने दिले आहे. रविवारी राजपूत सकाळी दुकान उघडण्याची आल्यावर त्यांना आपल्या दुकानाचा पत्रा कापलेला दिसला व दुकानातील असणारे सामान,मटेरियल अस्ताव्यस्त पडलेले,पसरलेले दिसले. त्यांनी त्वरित दुकान जागा मालक अविनाश पवार यांना कळविले त्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली व त्वरित १०० नंबर फोन करून घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून तपास, चौकशी व माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. दुकानातील अंदाजे चार ते पाच लाखांचा माल चोरीला गेला आहे. असे राजपूत यांनी सांगितले.काहि दिवसांपुर्वी या रस्त्यावरील अशीच चार ,पाच दुकाने फोडुन चोरी झाल्याची घटना घडली होती.