बिग बॅाक्सचा विजेता सूरज चव्हाणच होणार असे सगळ्यांना वाटत होते. आणि ही गोष्टी सत्यात उतरली असून, यंदाच्या सिझनचा विनर ठऱलाय सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. रिल स्टारपासून सुरू झालेला सूरजचा प्रवास त्याला बिग बॅाक्सच्या घरात घेऊन गेला. सुरूवातीला त्याला या खेळाबद्दल काही माहिती नव्हतं, तरी देखील त्याने त्याच्याजवळ असलेल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बिग बॅासची ट्राफी आपल्या नावे केली आहे.
मोठ्या दिमाखात बिग बॅाक्स शोचा ग्रॅन्ड फिनाले पार पडला. बिग बॅासच्या घरात अनेक नावाजलेल्या व्यक्ती आल्या होत्या. मात्र सूरज याने सर्वांची मने जिंकली. रितेश देशमुख याने यंदाच्या शोचे होस्टिंग केले. सगळ्यात जास्त हिट शो म्हणून या शोकडे पाहिले गेले. हा सिजन खूप गाजला. या शोची विनर निक्की होणार असे वाटत होते. मात्र टॅाप दोनमध्ये अभिजित आणि सूरज गेले. आणि सूरजने विजय खेचून आणत बिग बॅासची टॅाफी आपल्या नावे केली. यावेळी त्याला खूप गहिवरून आले होते. डोळ्यात आनंदाअश्रू ओघळत होते.
दिग्दर्शक केदार शिंदेच्या पिक्चरमध्ये झळकणार सूरज
या ग्रॅन्ड फिनालेमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला त्यांच्या नव्या पिक्चरमध्ये घेणार असल्याचे जाहीर केले. पिक्चरचे नाव झापूकझूपक असणार असून, या पिक्चरमध्ये सूरज चव्हाण लीड रोलमध्ये असणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.