विधानसभेमध्ये व लोकसभेमध्ये पूर्ण ताकतीने पक्ष उतरणार- जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे
राजगड न्युज नेटवर्क
पुणे : शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीमुळे राज्यात शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात विभागला गेला आहे. तसेच शिवसेनेच्या या फुटीचे परिणाम जिल्ह्यासह तालुका पातळीवर देखील बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या या फुटीचे परिणाम पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर तालुक्यात सुद्धा पाहायला मिळाले होते.
त्यानंतर आता शिवसेनेच्या (शिंदे गट) भोर तालुकाप्रमुख पदी दशरथ जाधव यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पी ए नचिकेत पाटील (Balasaheb Chandere ) यांच्या हस्ते देण्यात आले. सदर कार्यक्रम पुणे या ठिकाणी पार पडला.
दशरथ जाधव यांनी भोर तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून सर्वसामान्यांच्या अडचणींना प्रशासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच करोना काळात त्यांनी तालुक्यात मुख्य भूमिका देखील बजावलेली आहे. त्यांच्या या कामांची दखल घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदोरे यांनी जाधव यांच्याकडे (Bhor Taluka) तालुका प्रमुख पदाची धुरा सोपविली आहे. असून येणाऱ्या विधानसभेमध्ये व लोकसभेमध्ये पूर्ण ताकतीने पक्ष उतरणार असल्याचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी उपस्थितांना संबोधले.
यावेळी भोर तालुका तसेच इतर तालुक्यातील देखील निवडी करण्यात आल्या त्यामध्ये वेल्हा तालुका प्रमुख पदी सुनील शेंडकर यांची गणेश मसुरकर यांची भोर विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली तर कामगार सेना प्रमुख पदी ओंकार तांदळे व विभाग प्रमुख पदी राजेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच विद्यार्थी सेना उपतालुका प्रमुख पदी विशाल पवार यांची निवड करण्यात आली असून विधान सभेची तयारी सुरू झाल्याची दिसून येत आहे.
दरम्यान, यावेळी पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे पीए नचिकेत पाटील व पुणे युवा सेना जिल्हाप्रमुख संतोष घारे व जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे महिला जिल्हाप्रमुख व इतर तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.