भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर : भोर -वेल्हा उपविभागातील रिक्त पोलीस पाटलांची भरती परीक्षा रविवार दि ८ सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होणार असून सदर परिक्षा हि भोर-भोलावडेतील राजा रघुनाथराव विद्यालयात होणार आहे.
भोर वेल्हा उपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदांच्या भरती बाबत ३ जुलै रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता ,तर ४ ते १८ जुलै या कालावधीत रिक्त पोलीस पाटील पदांसाठी अर्ज मागविले होते सदर प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध केली होती पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ही १ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती परंतु यावेळी या उपविभागातील मुसळधार पाऊसाची परिस्थिती लक्षात घेता हि परिक्षा जिल्हाधिकारी पुणे यांनी (कुळकायदा शाखा) आदेशानुसार ३१ जुलै रोजी स्थगिती देत पुढे ढकलण्यात आली होती.
या परीक्षेचे नव्याने वेळापत्रक जाहीर केले असून नव्या वेळापत्रकानुसार पात्र उमेदवारांना शुक्रवारी दि.६ टपालाद्वारे प्रवेश पत्र पाठवण्यात येणार असून प्रवेश पत्र मिळाले न मिळाल्यास त्याच दिवशी भोर उपविभागीय अधिकारी कार्यालयातून ते उपलब्ध करून देणार आहेत.
मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी बुधवार ११ ऑक्टोंबरला प्रसिद्ध होणार असून कागदपत्राची पडताळणी व तोंडी परीक्षा , मुलाखत १२ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान (गुरुवार ते रविवार )शासकीय सुट्टीचे दिवस धरून घेण्यात येणार आहे, त्यानंतर अंतिम पात्र उमेदवार निवड यादी १८ ऑक्टोंबर बुधवार रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे व ही पोलीस पाटील रिक्तज्ञपद भरती प्रक्रिया यामध्ये परिक्षा, मुलाखती, निवड प्रक्रिया अशा भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शकपणे राबविण्यात येणार असल्याचे भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.