भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर पासून तीन ते चार किलो मीटर अंतरावर असलेल्या बारे खुर्द गावात एकमेकांनाच्या वैमनस्यातून रस्त्यांची अडवणूक केल्याच्या घटना घडली आहे.
बारे खुर्द येथे एका इसमाने आपल्या स्वतःच्या शेतातुन येणा-या जाणा-या रस्त्यातुन लोकांची अडवणूक केली. परंतु त्या शेताच्या रस्त्यावरून ज्या माणसाला त्या रस्त्यावरून ये जा करता आले नाही म्हणून त्या इसमाने आपल्या स्वतःच्या जागे समोरील बारे खुर्द गावातील विठ्ठलवाडी येथील ये जा करण्याचा रस्ता अडविला . परंतु यामुळे बारे खुर्द गावच्या विठ्ठलवाडी येथे ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली, तसेच ज्या इसमाने शेतात जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचा रस्ता अडविला त्यामुळे देखील ऐन सणासुदीच्या काळात कामाच्या धावपळीत गैरसोय झाल्याने येथील नागरिकांची देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
बारे खुर्द गावात यामागेही स्मशानभूमीच्या रस्त्यावरून मोठी दहशत माजली होती. स्मशानभूमीला जाण्याचा रस्ता असाच अडवणूक केल्याने अंत्यविधीचा कार्यक्रम होत नव्हता परंतु गावातील नागरिकांनी याचा पुढाकार घेऊन प्रशासनाच्या मदतीने हा रस्ता खुला केला होता. असाच विठ्ठलवाडी येथे जाण्याचा मार्ग व तेथील शेतात जाण्याचा रस्ता खुला करावा असे विठ्ठलवाडी येथील रहिवासी नागरिक करत आहेत कारण याचा मोठा फायदा येथील नागरिकांना होणार असून, पूर्व वैमनस्य देखील मिटणार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत.