पत्रकार माणिक पवार यांना आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार
नसरापूर: बनेश्वर सेवा मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहात बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या गुणवंतांचा आदर्श जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला असून पत्रकार माणिक पवार यांना आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
नसरापुर ( ता. भोर ) बनेश्वर येथे बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी ( दि. ९ ) रोजी अखंड हरीनाम सप्ताह पार पडला. आळंदी येथील गणपत महाराज जगताप यांना वारकरी जीवनगौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. १५ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप होते. आदर्श समाजभूषण म्हणून दीपक दिनकर काकडे गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय उद्योजक सतीश कुंभार यांना तर आदर्श गोपालक म्हणून आप्पासाहेब वाल्हेकर, पशुसंवर्धन कृषीभूषण पुरस्कार शिरीष तांगडे व आदर्श उद्योजक सोपानराव घाटे तसेच दैनिक पुढारीचे पत्रकार माणिक बाबासाहेब पवार यांना आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
या प्रंसगी राज्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष कृष्णांजी रांजणे, उद्योजक नानासाहेब भिंताडे, सचिव संपतराव तनपुरे, भाजपचे भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, निवृत्त पोलीस अधिकारी यशवंतराव कदम, उपसरपंच सुधीर वाल्हेकर, गणेश दळवी, एकनाथ कोंडे, जे.के. डिंबळे, नंदकुमार काजळे, चंद्रकांत निगडे, नरसिंग ढेकाणे, वनरक्षक संध्या कांबळे, ज्योती चव्हाण, अर्चना गयावळ, प्रियंका भोसले, चोपदार राजाभाऊ कुंभार, जालिंदर जाधव उपस्थित होते. गौरव महाराज उडापे ( पुणे ) निलेश महाराज वाणी ( शेळगाव ), सुनील महाराज शिंदे ( वेल्हे ), कबीर महाराज आतार ( शिवापूर ), बंडातात्या कराडकर, पांडुरंग महाराज घुले, उमेश महाराज दशरथे ( मानवत ) यांची कीर्तने रंगली होती. भागवताचार्य तुकाराम महाराज शास्त्री यांच्या ‘रामायण कथा’ ने काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन संगीताचार्य गणेश महाराज भगत यांनी केले. माजी उपसरपंच गणेश दळवी यांनी आभार मानले.