पुष्पा नावातच फायर असलेला या सिनेमाचा दुसरा भाग रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहिला मिळत आहे. हा सिनेमा जवान, बाहबुली, बाहुबली २ आरआरआर आदी सर्वच पिक्चरचं रेकार्ड मोडून बॅाक्स अॅाफिसवर आपला जलवा दाखवणार असल्याचं दिसत आहे. पण अशातच देशभरातील बहुतांशी ठिकाणच्या सिंगल स्क्रीन आणि मल्टीपेक्स चित्रपटगृहात पिक्चरच्या तिकिट दरांत काहीशी वाढ केल्याने सामान्य प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरीही पुष्पा २ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळत आहेत. साधारण कोणताही पिक्चर ज्यावेळी थेएटर्समध्ये रिलीज करण्यात येतो, त्यावेळी सकाळी ९ वाजता पिक्चरचा पहिला शो प्रदर्शित केला जातो. पण गेल्या काही वर्षांमध्ये ही गोष्ट मोडीत काढून गल्लाभरू पिक्चर सकाळी ६ वा ७ वाजता प्रदर्शित करण्यात येत आहे. पुष्पा २ पिक्चरनं तर हे मोडीत काढून हैद्राबादमधील काही थिएटर्समध्ये मध्यरात्री ३ वाजता शो प्रदर्शित केला असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहे. असो.
तिकिट वाढवल्याचा फायदा सिंगल स्क्रीनला अधिक होईल
विषय हा होता पिक्चरच्या तिकीट दरांत वाढ केल्याचा. पुष्पा २ पिक्चर देशभरासह परेदेशात तब्बल साडेतीन हजारांहून अधिक स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे. पुढचा एक महिना किंवा त्याहूनही अधिक काळ बॅाक्स अॅाफिसवर पुष्पाचा राज असणार यात काही शंका नाही. या काळात कोणताही मोठा पिक्चर रिलीज करण्याचं धाडस इतर निर्मात्याने न केल्याने साहजिकच त्याचा फायदा पुष्पा २ ला मिळेल. परिमाणी थिएटर्समध्ये पुष्पा २ चे शो थिएटर्सचे मालक दाखवतील. याचा फायदा त्यांना मिळणाऱ्या उत्पनात होईल. देशभरात मल्टीपेक्सच जाळ मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसत आहे. सिंगल स्क्रीन बंद होतील असा एक सूर अनेकांनी आजवर आवळला पण बदलत्या प्रवाहात देखील सिंगल स्क्रीन पाय रोवून उभे आहेत. चार वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर पुष्पा २ मोठ्या दिमाखात रिलीज करण्यात आला आहे.
गाण्यांनी मार खाल्ला
पिक्चर पाहून आलेल्या बहुतांशी प्रेक्षकांनी पिक्चर लय भारी आहे. पिक्चरमधील अॅक्शन अल्लुचा म्हणजेच लाडक्या पुष्पाचा डॅायलॅाग फेक अंदाज वन लेव्हल अप आहे. अॅक्शन तर कधी या अगोदर पाहिला नाही, अशा प्रकारीची आहे. श्री वल्ली म्हणजेच रश्मिकाला जास्त फुटेज पिक्चरमध्ये नसली तरी पुष्पा आणि तिची केमिस्ट्री नाद आहे. पिक्चरची लांबी ३ तास २० मिनिटं असली तरी पिक्चर कोणत्याही ठिकाणी बोर वाटत नाही. पण पिक्चरमधील गाणी काय बरोबर नाही. अशी खंत अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखवली आहे. यामुळे पिक्चरनं गाण्यात मार खाल्ला असे म्हणावं लागेल. याउलट पुष्पाचा भाग गाण्यांनी भरलेला होता. उ अनटा वा गाण्यावर थरकलेली अभिनेत्री समंथाच्या गाण्याने सगळ्यांना घायाळ केलं होत. तसेच सामे, श्री वल्ली आणि ऐ बेटा ये मेरा अड्डा या गाण्यांनी देखील लोकप्रियतेचा कळस गाठला होता.