तत्कालीन महिला उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी सदर गुन्ह्याचा कसून व निःपक्ष तपास केल्यामुळे आरोपीस सजा
फलटण : चौधरवाडी येथील आरोपी हर्षद पप्पु रणदीवे (वय २० वर्ष) याच्यावर दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक वृषाली देसाई फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे होता.
गुन्ह्यातील आरोपीने पिडीत मुलीला “तु जर का कोणाला काही सांगीतलेस तर तुला मारून टाकेन” अशी धमकी दिली होती. परंतु सदर गुन्ह्यातील तपासी अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी पिडीत अल्पवयीन मुलीला व तिच्या घरच्यांना घाबरून न जाता धीर देत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्या पिडीत कुटुंबियांच्या मागे भक्कम उभ्या राहिल्या. वृषाली देसाई यांनी या गुन्ह्यात साक्षीदारांना विश्वासात घेऊन ५ साक्षीदार उभे केले. त्यांनी सदर गुन्ह्याचा कसून व निःपक्ष तपास करून दोषारोप पत्र करून मा. न्यायालयात पाठवले.
सदरचा खटला मा. श्रीमती के. व्ही. बोरा सो विषेश, जिल्हा सत्र न्यायाधीश सो सातारा यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे मंजुषा तळवलकर सहा, सरकारी वकील सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले, नमुद केसमध्ये एकुण ५ साक्षीदार तपासले, केवळ परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत न्यायालयात वृषाली देसाई यांनी सादर केलेला पुरावा व सरकारी वकील यांच्याकडील पुरावे ग्राह्य मानुन मा.विषेश सत्र न्यायाधीश यांनी काल शनिवार (दि.०६ जानेवारी २०२४) रोजी यातील आरोपी हर्षद पप्पु रणदीवे यास बालकाचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ७,८अन्वये ४ वर्ष सश्रम कारावासाची सजा सुनावली आहे.
तत्कालीन उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी कसून व निःपक्ष पने केलेल्या तपासामुळे आरोपीस सजा झाल्याची चर्चा फलटण शहर व परिसरात ऐकायला मिळत आहे. यामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.