पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे
सांस्कृतिक आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या शुर वीर धाडशी कन्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या शीतल महाजन हिने मराठमोळी नऊवारी साडी परिधान करीत पॅरामोटरवरून तब्बल चार हजार उंच आकाशातून खाली उडी मारण्याचे धाडसी कृत्य केले. त्यांच्या या अनोख्या धाडसी पराक्रमामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
स्त्री शक्तीचा अद्भूत साक्षात्कार घडवून मराठमोळ्या नऊवारी साडीचा एक अनोखा इतिहास त्यांनी घडविला आहे. सांगली येथील एका आयोजित महिला आदिशक्ती कार्यक्रमात त्यांनी आपला पराक्रम दाखऊन भारतीय पराक्रमी नारी शक्तीची मान उंचावली आहे. या पराक्रमात भारतीय दलातून निवृत्त पायलट चंद्रकांत महाडिक यांनी एका खाजगी प्लाइंग रायनो पॅरामोटर तंत्रच्या मदतीने शितल महाजन सह आकाशात उड्डाण केले.
शितल महाजन यांचा ही 802वी पॅराशुट जम्प होती. यासाठी संजय संकपाळ आणि रायनचे संचालक प्रशांत काकडे यानी विशेष सहकार्य केले. आजच्या स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास द्विगुणित होऊन जगातील स्त्रियांनी आत्मरक्षित व्हावे म्हणून मराठमोळ्या वेशभुषा परिधान करुन हा पराक्रमी इतिहास रचला, असल्याचे शितल महाजन यानी सांगितले. तर पॅरामोटर्सच्या सह्याने अनेक गगन भरारी घेणाऱ्या पायलट चंद्रकांत यांनी या पराक्रमात पायलटची कामगिरी करण्याची संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.