जेजुरीः येथील राजेवाडी गावच्या हद्दीत दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या गावठी दारुची विक्री करणाऱ्या इसमास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कॅान्स्टेबल प्रकाश पोपट यादव यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी छुप्प्या पद्धतीने गावठी हातभटीची दारुची विक्री करणाऱ्या गुन्हा दाखल केला असून ओंकार शिवाजी राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13/12/2024 रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मौजे राजेवाडी गावच्या हददीत ता. पुंस्दर जि. पुणे येथे ओंकार शिवाजी राठोड हा स्वःताह घराच्या पत्राला आडोशाला बेकायदा बिगरपरवाना गावठी दारुची विक्री करीत असल्याचे पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी कारवाईत 2000 रुपये किंमतीची एकूण 20 लीटर गावठी हातभटीची तयार दारू जप्त केली आहे.