इंदापूरः युती आणि आघाडीतील पक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा करीत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने साधरण ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात असून, उर्वरित उमेदवारांची नावे दोन दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते येथे इंदापूर विधानसभेसाठीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी महाराष्ट्र पक्षाने युतीमध्ये सामिल होत राष्ट्रवादी पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. तसेच २८ तारेखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पवार यावेळी बोलताना म्हणाले.
शिव-शाहू-फुले आणि आंबेडकर यांच्या विचार धारेवर आम्ही राज्यात काम करत आलोय आणि इथून पुढच्या काळात देखील करणार आहे. दिल्लीत २७७ जागांवर तोडगा निघाला असून, उर्वरित ११ जागांवर तेढ आहे येत्या दोन दिवसांत सर्वच चित्र स्पष्ट होणार असल्याचे पवारांनी सांगितले. २९ अॅाक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, ३० अॅाक्टोबरला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. खऱ्या अर्थान प्रचाराला सुरूवात ही दिवाळीनंतरच होणार असल्याचे पवार म्हणाले. ११ जागेसंंदर्भातील निर्णय रविवारपर्यंत घेणे बंधनकारक असून, राज्यातील जागांसंदर्भातील सर्व चित्र येत्या दोन दिवसांमध्ये स्पष्ट होणार असल्याचे पवारांनी सांगितले.