इंदापूरः आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी भव्य रॅलीचे आयोजन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या रॅलीमध्ये खा. सुप्रिया सुळे या सहभागी झाल्या होत्या. तसेच या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. त्या अगोदर त्यांची एक जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये हर्षवर्धन पाटील हे कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना अचानक व्यासपीठावर एक व्यक्ती येऊन त्याने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचे कथन केले. यावेळी संबधित व्यक्तीला काही लोकांना जबरी मारहाण करून त्याचा मोबाईल आणि त्याच्या जवळ असलेले कॅश नेली असल्याचे त्याने सांगितले.
या व्यक्तीचे नाव रणजित गुटाळ असून, ही व्यक्ती येथील एका पतसंस्थेमध्ये नोकरीला आहे. त्याने एक गाडी फॅायनास करून खरेदी केलेली आहे. नेहमीप्रमाणे ही व्यक्ती पतसंस्थेमध्ये काम करीत होती. यावेळी त्या ठिकाणी फायनास कंंपनीचे लोकं आली. त्यांनी या व्यक्तीला बाहेर बोलावले आणि गाडीचा हप्ता आताच्या आता भर असे सांगितले. १० तारेखला हप्ता जमा असे या व्यक्तीकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी या व्यक्तीला धमकी देत गाडीवर बसून बाहेर आणले. तू आमचं काहीच करू शकतं नाही आम्ही मामाची माणसं आहेत असे संबंधित व्यक्ती या व्यक्तीला म्हणाले.
गाडीवरून आणलेल्या व्यक्तींनी गुटाळ यांना मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल व त्यांच्या जवळ असलेली काही कॅश नेली असल्याचा गंभीर आरोप गुटाळ यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराचे चित्रकरण त्यांनी त्या मोबाईलमध्ये केले असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या ठिकाणी गुंडगिरी, टोळीयुद्ध आणि भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असे पाटील यावेळी म्हणाले. तसेच या संपूर्ण प्रकारावर इंदापूरची जनता नक्की उत्तर देईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.