कुंदन झांजले: राजगड न्युज
भोर: तालुक्यातील जनतेच्या आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या व जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून तालुक्यातील जनतेची मनापासून सेवा करणा-या आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी, राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव व अनंत-निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर वेल्हा मुळशी च्या अध्यक्षा स्वरूपाताई थोपटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार (दि.२६) अनंतराव थोपटे महाविद्यालयात विनामूल्य,मोफत महाआरोग्य शिबीर पार पडले या शिबिरासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.तालुक्यातील हजारो नागरिकांना याचा लाभ मिळाला.
या महाआरोग्य शिबिरात प्रामुख्याने डोळे,नाक ,कान ,घसा, रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर,हाडांचे विकार, मणका, गुडघेदुखी, कंबरदुखी, मुतखडा, स्त्रीयाचे आजार, मुळव्याध,रक्त-लघवी तपासणी अशा सर्व रोगांवर मोफत विनामूल्य वैद्यकीय तपासणी करून औषधे देण्यात आली,व शस्त्रक्रियेबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सध्या सुरू असलेल्या साथींच्या आजारांवर ताप, थंडी, सर्दी, खोकला, जुलाब,उलट्या, अंगदुखी,डोकेदुखी, चक्कर यावर देखील मोफत आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आलीत.या शिबिरासाठी परगावावरून ,लांब पल्ल्याच्या परिसरातुन लोक आली होतीत. शिबीरात सर्वांची भोजनाची सोय केली होती.
तालुक्यातील जनतेसाठी आरोग्यवर्धिनी म्हणून ठरत असलेल्या स्वरूपा थोपटे यांच्यावर अभिष्टचिंतनानिमीत्त भोर वेल्हा मुळशी तालुक्यातुन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यापूर्वीही अनेकदा आरोग्य शिबिरांचा उपक्रम त्यांनी राबविला आहे. तालुक्यातील जनतेसाठी राबवित असलेले हे महाआरोग्य शिबीर,यातुन मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद व त्यांना होणारा लाभ यामुळे स्वरूपा थोपटे यांचे तालुक्यातुन मोठे कौतुक होत आहे.