वडगाव निंबाळकरः पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मुली व महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या आणि विनयभंगाच्या घटना राजरोजपणे घडताना दिसत आहे. येथील एका नामांकित महाविद्यातील एका १७ वर्षीय मुलीला अश्लिल हावभाव करून त्रास दिल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एका महाविद्यालयात १७ वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाच्या सायन्सच्या इमारतीमधून मुलगी जात असताना मिकी माऊस कशी आहेस? तू मला आवडतेस असे म्हणत अश्लील हावभाव केले. अशा प्रकारे मुलीला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर मुलीने पोलीस ठाणे गाठत दोघांवर विरुद्ध फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणी पोलिसांनी अविनाश नानासो पवार रा. वाणेवाडी ता. बारामती व तुषार सुरेश गुलदगड रा. पळशी ता. बारामती यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या एका वर्षापासून पीडित मुलीला रस्त्यात अश्लील हावभाव करून त्रास देण्यात येत होता. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने एसटीने प्रवास बंद करून महाविद्यालयातीच एका शिक्षकासोबत चारचाकीने महाविद्यालयात येत होती. एसटी स्थानकावर पीडित मुलगी येत नसल्याने आरोपींनी पीडितेला महाविद्यालयात येवून त्रास देण्यास सुरूवात केली. अखेर पीडित तरूणीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना याबाबत माहिती देत आरोपीं विरोधात वडगाव निंबाळकर पोलिसां तक्रार दाखल केली आहे.