मुंबईः येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागून विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील नेत्यांनी त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पक्षाअंतर्गत बैठक झालेल्या आहेत. सर्वच २८८ मतदारसंघातमध्ये विधानसभा समन्वयकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभेच्या दृष्टीने इच्छुकांची संख्या अधिक आहे, प्रत्येक इच्छुक उमेदवाराला वाटत आहे की संधी आपल्याच मिळणार पण आता विधानसभा समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हे समन्वय बुध लेव्हलवर काम करून त्या संदर्भात बैठका घेऊन संबधित उमेदवार का द्यायला हवा हे सांगणार आहे.
सुचविलेल्या नावांमध्ये संधी कोणाला द्यायची, हे आमच्या तिन्ही पक्षातील राज्यातील प्रमुख नेते ठरणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात महायुती आणि घटक पक्षात कोणताही तेढा नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधमध्ये समन्वय राखण्यासाठी विधानसभा समन्वयाची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी आधोरिखित केले. त्यांना बुधस्तरावरचे नियोजन करावे लागणार आहे. पक्षांतर्गत बैठका घेऊन महायुतीसोबत देखील बैठका या समन्वयक घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
फेक नॅरेटीव्ह विधानसभेला चालणार नाहीः देसाई
लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणार फेक नॅरेटीव्ही पसरविण्यात आला होता. त्या निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी असून, या निवडणुकीची वेगळी असल्याचे म्हणत आता फेक नॅरेटीव्ह चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.