Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

घरी बोलावून झाडल्या गोळ्या; गुन्ह्यासाठी आरोपीने कुटुंबातील सदस्यांची घेतली मदत, उरळी कांचनमध्ये काय घडलं?

दीड वर्षांपूर्वी दिले होते चाळीस लाख, काय आहे प्रकरण?

by SBPRNL
September 16, 2024
घरी बोलावून झाडल्या गोळ्या; गुन्ह्यासाठी आरोपीने कुटुंबातील सदस्यांची घेतली मदत, उरळी कांचनमध्ये काय घडलं?

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

उरुळीकांचनः  येथील मध्यवर्ती भागात पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन पैसे मागणाऱ्यास आपल्या घरी बोलावून त्याच्यावर गोळ्या झाडण्याची खळबळजन घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणातील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या उद्योजकास अटक केली असून, कारवाईमध्ये पोलिसांनी एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुसे व पिस्टलचे ४० जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. तसेच मुख्य आरोपी व त्यास या गुन्ह्यासाठी मदत करणाऱ्या इतर साथीदारांना देखील अटक केली आहे.

घरी बोलावून झाडल्या गोळ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी कालुराम महादेव गोते व शरद कैलास गोते यांचे आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे यांच्याशी आर्थिक व्यवहार झाले होते. सदर व्यवहारामध्ये फिर्यादींनी आरोपीकडे चाळीस लाख रुपये दीड वर्षांपूवी दिले होते. सदरची रक्कम परत देतो, असे सांगून आरोपी यांने फिर्यादी व त्यांचे साथीदार कालुराम गोले यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्याच्या रागातून आरोपीने त्यांच्याकडील परवाना असलेल्या पिस्टलमधून चार राउड फायरिंग केले. या घटनेत कालुराम गोते यांच्या हाताला व पायाला गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ झालेल्या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशनमधील वेगवेगळी पथके आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळून गेल्याच्या मार्गाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपून बसलेला आहे. त्यानुसार सदर ठिकाणाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे वय ४६ वर्ष रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि. पुणे याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता, सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे याने त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य १) निलीमा बापू उर्फ दशरथ शितोळे वय ४२ वर्षे २) जिग्नेश बापू उर्फ दशरथ शितोळे १९ वर्षे ३) आशा सुरेश घोसले वय ५२ वर्षे ४) निखील अशोक भोसले वय २५ वर्ष सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि. पुणे यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपीतांना न्यायालयाने दिनांक १८/०९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकपंकज देशमुख, पुणे प्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, बाळासाहेब कोरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, माळासाहेब खडके,अंमलदार अजित कराळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा मुतवळ यांच्या पथकाने केली असून पुढील तपास उरुळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.

Tags: crimenewspunegraminrajgadnewsuralikanchan
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
आमिषाला बळीः नोकरी लावतो म्हणत भामट्याने घातला ३४ लाखांचा गंडा; ओळख वाढवून साधला डाव, आरोपी फरार

आमिषाला बळीः नोकरी लावतो म्हणत भामट्याने घातला ३४ लाखांचा गंडा; ओळख वाढवून साधला डाव, आरोपी फरार

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group