शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एका युवकाला रात्रीच्या सुमारास कारमधून अपहरण करुन युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल बाळासाहेब शिवले, अनिकेत शहाजी शिवले, अक्षय कैलास कोबल व गणेश बाळासाहेब शिवले या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील प्रवीण कोल्हे हा युवक रात्रीच्या सुमारास त्याच्या दुकानात असताना काही युवक पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले, त्यांनी प्रवीण याला त्यांच्या जवळील कारमध्ये बसवून नरेश्वर मंदिर परिसरात घेऊन जाऊन जुन्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसचे लाकडी दांडक्याने प्रवीण या युवकाला बेदम मारहाण केली.
याबाबत प्रवीण अशोक कोल्हे वय ३५ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विशाल बाळासाहेब शिवले, अनिकेत शहाजी शिवले, अक्षय कैलास कोबल व गणेश बाळासाहेब शिवले सर्व रा. वढू बुद्रुक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करीत आहेत.