पुणेः चारित्र्याच्या संशयावरुन (Suspicion of character) पत्नीला मारहाण करुन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात सहकारनगर पोलीस( sahakarnagar police station) स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी फिर्यादी यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पत्नीचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सत्यवान मोहिते हा शाहु बँक चौक धनकवडी येथे येणार आहे, त्यानुसार त्या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपी सत्यवान अनिल मोहिते (वय २६ वर्षे, रा. शेळगाव ता इंदापुर जि पुणे) चौकशी केली असता, सदरचा गुन्हा त्याने केल्याचे कबुल केले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परि. २ पुणे स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, सहकागनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे, सहा. पो. उपनिरीक्षत बापु खुटवड, पोलीस अंमलदार, महेश मंडलिक, अमोल पवार, चंद्रकांत जाधव, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, अमित पदमाळे, सागर कुंभार, खंडु शिंदे, विशाल वाघ, बबलु मिसे, योगेश ढोले, महेश भगत यांनी केली आहे.