नवी दिल्ली : नर्सिंग पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने महिला आणि पुरुष नर्सेसची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2240 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागांतर्गत असणार आहे.
जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी किंवा नर्सिंगमध्ये बीएससी पदवी असलेले उमेदवार स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करू शकतात. यासोबत उत्तर प्रदेश नर्स आणि मिडवाइफ कौन्सिलमध्ये नोंदणी देखील असावी. अधिसूचनेनुसार, स्टाफ नर्सच्या 2240 रिक्त पदांपैकी, 2069 महिलांसाठी आणि 171 पुरुषांसाठी असणार आहेत.
कधी करता येणार अर्ज?स्टाफ नर्स पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठीचा फॉर्म 21 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. स्टाफ नर्स भरतीसाठीचा फॉर्म अधिकृत वेबसाइट http://uppsc.up.nic.in वर जाऊन भरावा लागणार आहे.