आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टकडून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
भोर -आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर -वेल्हा -मुळशी आयोजित सामाजिक उपक्रमांतर्गत सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात शाही थाटात रविवार २८ एप्रिलला २७ विवाह भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात राजेशाही थाटात उत्साहात संपन्न झाले.
तालुक्यात आत्तापर्यंत श्री सद्गुरु नारायण महाराज यांच्या उपस्थितीत अनंतराव थोपटे गौरव समितीच्या वतीने अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये १२ वेळा सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत विवाह सोहळे पार पडले आहेत.आत्तापर्यंत सोहळ्यात ७५४ विवाह झाले असून यंदाच्या १३ व्या विवाह सोहळ्यात २७ विवाह संपन्न झाले.यामध्ये ६२५ स्वयंसेवक काम केले असून १० हजार लोकांचे भोजनाची व्यवस्था केली होती. सोहळ्यासाठी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर – वेल्हा – मुळशी, राजगड ज्ञानपीठ ,राजगड कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद, दत्त दिगंबर वाहतूक संस्था यांचे सहकार्य लाभले.आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर विश्वचैतन्य परमपूज्य अण्णा महाराज यांचे उत्तराअधिकारी स्वामी पोपट महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
यावेळी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा स्वरूपाताई संग्राम थोपटे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी संध्या सव्वालाखे, पृथ्वीराज थोपटे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, पोपट सुके, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, गणेश पवार, अमित सागळे, अतुल किंद्रे, संदीप नांगरे, रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ आदींसह भोर – वेल्हा – मुळशीतील मान्यवर , पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लक्री ड्रॉ सर्वधर्मीय बिगरहोंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात लकी ड्रॉ मध्ये ११ ड्रॉ काढण्यात आले असून अनुक्रमे हिरोहोंडा ,फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, पीठगिरण, टेबल फॅन,शेगडी ,मिक्सर ,डिनर सेट, टीव्ही अशी बक्षीसे देण्यात आले.